औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद शहराला पावसाने झोडपले. आज पहाटे ३:३८ ते ०४:०३ या २५ मिनिटात ढगफुटी सदृश पाऊस झाला. औरंगाबाद शहराला पावसाने झोडपले असून, या वर्षी प्रथमच शहरात गेल्या एका महिन्यात तिसर्यांदा ढगफुटी सदृश पावसाने हजेरी लावली आहे.
गेल्या सोमवारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.
या चक्रीवादळाचा प्रवासानंतर उत्तर महाराष्ट्रात व गुजरात मार्गे अरबी समुद्रात गेल्याने या गुलाब चक्रीवादळाचे नामकरण शाहीन करण्यात आले.
शाहीन चक्रीवादळ सध्या सक्रिय असून, ओमानच्या आखातात केंद्रित आहे.
०१ ऑक्टोबर रोजी दिवसभर शहरावर आकाश निरभ्र राहिल्याने आर्द्रता घटल्याने कमाल तापमानान सुमारे दोन अंशाची वाढ नोंदवली गेली. शाहीन चक्रीवादळाने निर्माण केलेली वातावरण निर्मिती, परतीचा पाऊस व औरंगाबाद शहरावरील वातावरण बदलाचा एकत्रीत परिणाम आज पहाटे शहरावर झालेल्या जोरदार पावसावर दिसून आला.
पंचवीस मिनिटांत ५१.२ मिमी पावसाची नोंद
आज ( दि. २) पहाटे ०३:२५ वाजता औरंगाबाद शहरात पहाटे ०३:३८ दरम्यान मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पहाटे ०३:३८ ते ०४:०३ या २५ मिनिटात विजांचा कडकडाटासह सरासरी ११८ मिलीमीटर प्रति तास ढगफुटीच्या वेगाने पाऊस पडला.श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब, औरंगाबाद
हेही वाचलं का ?