Mehbooba Mufti: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महबुबा मुफ्तींना अटक | पुढारी

Mehbooba Mufti: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महबुबा मुफ्तींना अटक

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : जम्मू काश्मीर प्रशासनाकडून सुरु असलेली अतिक्रमणविरोधी मोहीम थांबविली जावी, या मागणीसाठी पीडीपी नेत्या महबुबा मुफ्ती यांनी आज (दि.८) बोट क्लब परिसरात धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी महबुबा यांच्यासह त्यांच्या समर्थकांना अटक केली.

जम्मू काश्मीरमध्ये गुंडगिरी सुरु असून या भागाला दुसरे अफगाणिस्तान बनविण्याचा केंद्र सरकारचा कट असल्याचा आरोप महबुबा यांनी आंदोलकांसमोर बोलताना केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेला विध्वंस या भागाला पॅलेस्टाईनपेक्षा भयंकर करेल, असेही त्या म्हणाल्या. जम्मू-काश्मीरमधील २० जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात आहे. सरकारी जमिनींवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आतापर्यंत असंख्य इमारतींवर बुलडोझर चालविण्यात आलेला आहे. दुसरीकडे या मोहिमेला पीडीपीसह इतर राजकीय पक्षांनी विरोध केला आहे.

हेही वाचा 

Back to top button