पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ जॅकेटची चर्चा, जाणून घ्‍या काय आहे खास… | पुढारी

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' जॅकेटची चर्चा, जाणून घ्‍या काय आहे खास...

पुढारी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते सोमवारी (दि.०६) बेंगळूर येथून भारत ऊर्जा सप्ताहाचा  (India Energy Week) प्रारंभ झाला. या वेळी इंडियन ऑइल कंपनीने त्यांना प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट भेट दिले. इंडियन ऑइलने भेट दिलेले हे जॅकेट घालून आज अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित राहिले आहेत.  प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करत बनवलेले जॅकेट घालून पीएम नरेंद्र मोदी यांनी एकप्रकारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्‍या या जॅकेटची चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू आहे. ( PM Narendra Modi Jaket )

मोदींनी घातलेल्या जॅकेटची वैशिष्ट्ये

इंडियन ऑइल कंपनीने पर्यावरणपुरक योजनेची घोषणा केली आहे. याला ‘अनबॉटल इनिशिएटिव्ह’ असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून पेट्रोल पंप आणि एलपीजी एजन्सींवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारचे जॅकेट बनवण्याची कंपनीची योजना आहे. यामध्ये एक जॅकेट बनविण्यासाठी २८ प्‍लॉस्‍टिक बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो.

कंपनीने दरवर्षी १० कोटी प्लॅस्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. टी-शर्ट आणि शॉर्ट्स बनवण्यासाठी पाच ते सहा बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. एक शर्ट बनवण्यासाठी 10 बाटल्या तर पँट बनवण्यासाठी 20 बाटल्या लागतात. या प्रक्रियेत प्रथम बाटलीपासून फायबर तयार केले जाते, नंतर त्यापासून सूत, नंतर कापड बनवले जाते आणि शेवटी जॅकेट तसेच तर वस्त्र तयार केली जातात, अशी माहिती कंपनीने सांगितली आहे.

PM Narendra Modi Jaket : ‘ही’ आहेत जॅकेटची खासियत ?

  • हे जॅकेटला लागणारे कापड पूर्णपणे ग्रीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
  • जॅकेट बनवण्यासाठी लागणाऱ्या  बाटल्या निवासी भागातून आणि समुद्रातून गोळा केल्या आहेत.
  • जॅकेटवर एक क्यूआर कोड आहे. तो स्कॅन केल्‍यास जॅकेटची सविस्‍तर माहिती मिळणार आहे.
  • रिसायकल पद्धतीने बनवलेल्या या जॅकेटची किंमत ही 2,000 रुपये आहे.

PM Narendra Modi Jaket : पर्यावरण संवर्धनाचा संदेश

प्लॅस्टिक बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर करण्यात आल्याने पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे कंपनीने म्‍हटलं आहे. कॉटनच्‍या कपड्यांना रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो तर  पॉलिस्टरला डोप डाईंग केले जाते. यामध्ये पाण्याचा थेंबही वापरला जात नाही. त्यामुळे या योजनेमुळे पाण्याची देखील मोठी बचत होणार आहे. प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर करून लवकरच सशस्त्र दलांसाठी नॉन-कॉम्बॅट युनिफॉर्म बनवण्याची इंडियन ऑईलची योजना असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

इंडियन ऑइलच्या या उपक्रमाचे पीएम मोदींनी कौतुक केले आहे. त्‍यांनी म्‍हटलं आहे की,  “हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. रिड्यूस, रियुज आणि रिसायकल हा मंत्र आपल्या मूल्यांमध्ये समाविष्ट आहे.”

हेही वाचा:

Back to top button