Delhi Fire Tragedy : दिल्ली बेबी केअर सेंटर दुर्घटना; रुग्णालयाच्या मालकाला अटक | पुढारी

Delhi Fire Tragedy : दिल्ली बेबी केअर सेंटर दुर्घटना; रुग्णालयाच्या मालकाला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला शनिवारी (दि.२५) भीषण आग लागली.  या आगीत ६ मुलांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर या रुग्णालयाचा मालक डॉ.नवीन फरारी होता. त्याला आज (दि.२६) दिल्ली पोलिसांनी अटक  केली असून याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.

या केअर सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीतून शनिवारी रात्री १२ मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र यातील ७ मुलांचा मृत्यू झाला तर ५ मुलांवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर या हॉस्पिटलचा मालक जयपूरला पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. बेबी केअर सेंटरच्या शेजारी एक इमारत होती, तीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. मात्र सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बेबी केअर सेंटरमध्ये काही ऑक्सिजन सिलिंडर होते. त्यामुळे हा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक स्कूटर, एक रुग्णवाहिका आणि जवळच्या उद्यानाच्या काही भागालाही आग लागली असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग दिली. तसेच बेबी केअर सेंटरकडे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी या दुर्घटनेबाबत जलद गतीने तपास करावा, असे निर्देश मुख्य सचिव नरेश कुमार यांना दिले आहेत. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत अहवाल सादर करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button