नगर : आ. थोरातांच्या कन्येच्या नावे ट्विटरवर बनावट खाते | पुढारी

नगर : आ. थोरातांच्या कन्येच्या नावे ट्विटरवर बनावट खाते

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या थोरल्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने फेक ट्विटर अकाउंट तयार केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आली आहे. आ. बाळासाहेब थोरात यांच्या थोरल्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने अज्ञात आरोपीने ट्विटरवर फेक (बनावट) अकाउंट तयार केले आहे. या ट्विटर अकाउंटवर डीपीवर अज्ञात व्यक्तीने आ. थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांचा फोटो वापरून थोरात कुटुंबियांचा फोटो कव्हर फोटोमध्ये वापरला आहे.

या फेक अकाउंटवरून अज्ञात व्यक्तीकडून नियमितपणे ट्विट केले जात होते. हे अकाउंट आ.थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांचे असल्याचे समजून अनेकांनी या ट्विटर अकाउंटला फॉलो देखील केले होते. यात अनेक काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, या संदर्भात आ. बाळासाहेब थोरात यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. यासंबंधीचे ट्विट करीत त्यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करीत आ. थोरात यांनी म्हटले आहे की, माझी कन्या शरयू देशमुख यांच्या नावे सुरू असलेलेे डहरीर्रूी ऊशीर्हाीज्ञह हेे ट्विटर अकाउंट फेक आहे. त्या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे.

Back to top button