नाशिक : गुरुइच्छा मित्र मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात | पुढारी

नाशिक : गुरुइच्छा मित्र मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुने कुंभारवाडा वसाहत परिसरातील गुरुइच्छा मित्र मंडळाच्या वतीने भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जुने नाशिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गुरु इच्छा मित्र मंडळ अध्यक्ष गौरव क्षीरसागर यांनी प्रमुख पाहुणे चव्हाण यांचे स्वागत केले. कार्यक्रमास सामाजिक नेते नाना शिलेदार, हेमंत शुक्ल, कविता तेजाळे, रमेश पाटील, सुरेश गायकवाड, सुनील गायकवाड, अण्णा गायकवाड, उमेश जाधव, मोहन गायकवाड आदी मान्यवरांचे  स्वागत करण्यात आले यावेळी दिनेश चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिन का साजरा करतात याचे विवेचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य भारतास अर्पण केलेल्या संविधानाचा प्रत्येकाने मान-सन्मान राखावा, आदर करावा हे आपले मूलभूत कर्तव्य असल्याचे नमूद केले. जुने नाशिक शिवजन्मोत्सव दिनेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुरुइच्छा मित्र मंडळाचे अरविंद शिरसागर, रतन आप्पा काळे, दीपक काळे, मोहन गायकवाड, सुनील शिरसागर, गायकवाड, उमाकांत गायकवाड , शोभा जाधव परिसरातील नागरिक व बालगोपाल उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button