IND vs NZ 3rd Odi : रोहित शर्माने तब्बल ११०१ दिवसानंतर मोडले हे विक्रम | पुढारी

IND vs NZ 3rd Odi : रोहित शर्माने तब्बल ११०१ दिवसानंतर मोडले हे विक्रम

पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर वन-डे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केले. इदौरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेत हिटमॅनने शतकाचा दुष्काळ संपवला. त्याने तब्बल 1101 दिवसांनंतर वनडेत शतकी खेळी साकारली असून त्याने मोठे विक्रमही मोडीत काढले.

रोहित शर्माला शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 83 चेंडू लागले. या खेळाडूने आपल्या शानदार खेळीत एकूण 9 चौकार आणि 6 षटकार मारले.
रोहितचे हे शतक 2020 नंतर आले. त्याने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे वनडे शतक झळकावले होते.
रोहितने या शतकासह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हिटमॅन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रोहितशिवाय शुभमन गिलनेही या सामन्यात आपले शतक पूर्ण केले.

Back to top button