सांगली : खानापूरचे जवान जयसिंग भगत सियाचीनमध्ये शहीद | पुढारी

सांगली : खानापूरचे जवान जयसिंग भगत सियाचीनमध्ये शहीद

सांगली, पुढारी वृत्‍तसेवा : लेह लडाख भागात ग्लेशियर असलेल्या सियाचीन बॉर्डरवर 14 आणि 15 जानेवारी दरम्यान मोठी बर्फवृष्टी झाली. त्यात शहीद जयसिंग भगत डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना चंदीगडमध्ये मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरत्‍यान त्‍यांचा मृत्यू झाला. शहीद जयसिंग भगत हे मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत होते.

दरम्यान, जवान भगत यांच्या पत्नी ही बेळगाव मिलिटरी कॅम्प क्वार्टर येथे होत्या. त्यांना तातडीने चंदीगडमध्ये बोलावून घेण्यात आले होते. शहीद जवान भगत यांना तीन मुली आहेत.

जवान जयसिंग भगत यांचे मूळ गाव खानापूर तालुक्‍यातील आहे. शहीद जयसिंग भगत यांचे पार्थिव उद्या सकाळी मिल्ट्रीच्या विशेष विमानाने पुणे आणि तिथून खानापूर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर खानापूर ते गोरेवाडी रस्त्यावरील भगत मळा परिसरातील मातोश्री मंगल कार्यालयासमोरील पटांगणामध्ये शहीद जयसिंग भगत यांच्यावर शासकीय इतमामात उद्या सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

 

-हेही वाचा 

औरंगाबाद : पाडळी शिवारात शीर नसलेला मृतदेह आढळला

नागपूर : बागेश्वर सरकार समर्थक, हिंदुत्ववादी संघटनांचे नागपुरात आंदोलन

पुणे : गाडी अडवून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील संशयित जेरबंद

Back to top button