मविआत समन्वय ठेवला तर पुन्हा असा प्रसंग येणार नाही : संजय राऊत | पुढारी

मविआत समन्वय ठेवला तर पुन्हा असा प्रसंग येणार नाही : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानपरिषद निवडणुकीत काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. यापुढे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाहीत, असे सांगत नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

ते म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय होता. विधान परिषद निवडणुकीत काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. पण भारतीय जनता पक्षाने गुप्तपणे कारभार केला आहे. त्याबाबत काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कोणत्याही पक्षाला दोष देणार नाही. अशा संकटाला आमचा पक्षही सामोरे गेला आहे. वंचित आघाडीसोबत सुरू असलेल्या बोलणीबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला माहिती देत असतो. भविष्यात महाविकास आघडीने समन्वय ठेवणे गरजेच आहे. तांबे कुटुंबीय परंपरागत काँग्रेसचं निष्ठावान कुटुंब आहे, असे खासदार राऊत म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button