Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचे मोहनलाल सोबत मल्याळम चित्रपटात पदार्पण | पुढारी

Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचे मोहनलाल सोबत मल्याळम चित्रपटात पदार्पण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ अशी ओळख असेलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय, नृत्य आणि अदाकारीने अवघ्या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवले आहे. तमाम मराठी सिनेरसिकांवर आपला ठसा उमटवून आता ही अप्सरा साऊथकडे वळली आहे. ती आता आपल्या अदाकारीने मल्याळम सिनेरसिकांना मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. मोहनलाल या स्टार अभिनेत्यासोबत सोनाली कुलकर्णी मल्याळम चित्रपटात पादर्पण करत आहे. (Sonalee Kulkarni)

सोनाली कुलकर्णीने खुद्द आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ही बातमी दिली आहे. तिच्या या पोस्टनंतर नेटकरी व तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पोस्टसोबत तिने तिच्या मल्याळम चित्रपटाचे पोस्टर शेअर केला आहे. ‘मलाईकोट्टाई वालीबन’ असे तिच्या मल्याळम सिनेमाचे नाव आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत नवीन वर्ष… नवीन प्रवास.. आणि नवा प्रदेश असे कप्शन दिले आहे. (Sonalee Kulkarni)

मराठी कलाकार आता सिमोल्लघन करत आहेत. अनेक मराठी दिग्गज कलाकारांनी मराठी व्यतिरिक्त बॉलिवूड आणि साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. अभिनेते श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, नाना पाटेकर, अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी (सिनियर), सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Sonalee Kulkarni)

अभिनेता सयाजी शिंदे यांच्या सारख्या कसलेल्या अभिनेत्याने दाक्षिणात्य चित्रपटात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तमिळ आणि तेलगु चित्रपटातील अभिनेते अशी त्यांची वेगळी ओळख आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपले नशीब साऊथमध्ये आजमावू पाहत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सुद्धा बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेमे केले आहेत. आता तिच्या पाठोपाठ सोनाली कुलकर्णी हिने सुद्धा साऊथची वाट धरली आहे.

मराठी प्रेक्षकांनी सोनालीला डोक्यावर घेतले आहे. आता मल्याळम आणि साऊथच्या प्रेक्षकांना ही अप्सरा वेड लावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोहनलाल या मल्याळम आणि साऊथच्या कसलेल्या आणि दिग्गज अभिनेत्या सोबत ती काम करत आहे. यामुळे त्यांच्या सोबत सोनालीचा अभिनय पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)


अधिक वाचा :

Back to top button