पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड स्टार जेरेमी रेनर बर्फवृष्टीच्या (snow plow) दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. रेनरची प्रकृती "गंभीर पण स्थिर" आहे. ही दुर्घटना रविवारी घडली. जेरेमीचे कुटुंबीय त्याच्यासोबत असून प्रकृतीची काळजी घेत आहेत. पण, स्नो प्लेविंगची दुर्घटना कुठे झाली, याबाबत पुष्टी झालेली नाही. मीडिया रिपोर्टनुासर, रेनरकडे वाशो काउंटी, नेवादामध्ये (washoe county nevada) अनेक वर्षांपासून एक घर आहे. उत्तर नेवादातील काही भाग मागील वर्षीदेखील बर्फाच्या वादळात झाकोळला गेला होता.
बर्फाच्या वादळात अडकल्यानंतर जेरेमीला एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोनवेळा ऑस्कर नामांकन मिळालेल्या रेनरने चित्रपट थॉरनंतर मार्वल सीरीजमध्ये (Avengers and Captain America) अभिनय केला आहे. रेनरला २०१० मध्ये 'द हार्ट लॉकर'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठीचे ऑस्कर नामांकन मिळाले आहे. २०११ मध्ये 'द टाऊन'साठी सहाय्यक अभिनेता म्हणून ऑस्कर नामांकन मिळाले आहे.
रेनरने शेरिडनच्या २०१७ चे नाटक विंड रिवरमध्ये अभिनय केला होता.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ज्या प्रदेशात त्याचे घर आहे. त्या प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी झाली. ज्यामुळे वाशो आणि इतर काउन्टींमधील ३५ हजारहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला, अशी माहिती समोर आली आहे.