Nashik Crime : क्लासवरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणाला अटक | पुढारी

Nashik Crime : क्लासवरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणाला अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

क्लासवरून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. योगेश दामू जाधव, रा . नवीन नाशिक असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी सांगितले की, क्लास करून घरी जात असलेल्या मुलीची संशयित योगेश जाधव याने छेड काढत तिचा विनयभंग केला. मुलीने जाब विचारला असता त्याने दमबाजी केली. याबाबत मुलीच्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी योगेश जाधव याच्याविरुद्ध विनयभंग तसेच पोक्सो अंतर्गत कारवाई करत अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button