पिंपरी : पोलिस भरतीत वेगळे निकष ठेवावेत | पुढारी

पिंपरी : पोलिस भरतीत वेगळे निकष ठेवावेत

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने पोलिस भरतीचे आयोजन केले आहे. यामध्ये तृतीयपंथीयांनी दिलेल्या यशस्वी लढ्यामुळे त्यांनाही आता पोलिस भरतीत सहभागी होता येणार आहे. त्यानुसार, महाराष्ट्रामधून 73 तृतीयपंथीयांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केला आहे; मात्र भरतीमध्ये तृतीयपंथीय महिला आणि तृतीयपंथीय गटात मोडणारे समलैंगिक पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे निकष तयार करण्याची मागणी तृतीयपंथीयांकडून होत आहे.

पोलिस भरतीसाठी तृतीयपंथीयांनीदेखील अर्ज केले आहेत. त्यांच्या शारीरिक क्षमतेच्या तुलनेत ट्रान्सजेंडर महिला शस्त्रक्रिया व उपचारांमुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होत असल्याचे या गटातील पोलिस भरतीची तयारी करणार्‍यांकडून केली जात आहे.
त्यामुळे तृतीयपंथीयांमधील या गटांसाठी वेगवेगळे निकष ठेवून मैदानी चाचणी घेण्यात यावी. अन्यथा या नोकरीस पात्र होण्यापासून आम्ही वंचित राहू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

शारीरिक क्षमतेमुळे अन्याय होण्याची भीती
तृतीयपंथीय हा पूर्वीपासूनच वंचित घटक राहिलेला आहे. आपल्या अधिकार आणि हक्कांसाठी तो भांडत असून पुढाकार घेत आहे. मात्र, पोलिस भरतीत तृतीयपंथीयांच्या गटात अनेकांनी अर्ज केला आहे. शारीरिक क्षमता चाचणीत हा घटक ट्रान्स महिला पुरुषांपेक्षा वरचढ ठरणार आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार अशी भीती ट्रान्स महिलांमध्ये आहे.

तृतीयपंथीयांना पोलिस भरतीमध्ये सहभाग घेता यावा, यासाठी आम्ही उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) गाठले. आमच्या हक्कासाठी लढा उभा करावा लागला आणि आम्ही तो मिळविला. त्यानुसार, आम्हाला पोलिस भरतीमध्ये अर्जदेखील करता आला. मात्र शारीरिक क्षमात चाचणीमध्ये जर ट्रान्स महिलांसोबत समलैंगिक पुरुष पळविला गेला, तर तो ट्रान्स महिलांपेक्षा समलैंगिक पुरुषच उत्तीर्ण होणार. त्यामुळे ज्या प्रमाणे सामान्य पुरुष आणि सामान्य महिला असा शारीरिक क्षमतेनुसार वेगळा गट आहे. तसाच तृतीय पंथीयांमध्ये ट्रान्स महिला, टान्स पुरुष व समलैंगुक पुरुष असा वेगळा गट करून आम्हाला न्याय देण्यात यावा.

                                                      – निकिता मुख्य दल,
                                                      सुरक्षारक्षक, तृतीयपंथी

ट्रान्स महिला आणि पुरुषांवर शस्त्रक्रिया केली जाते. तसेच त्यांना अ‍ॅनास्थेशिया दिल्याने काहींना बराच काळ याच दुखणं सोसाव लागते तर काहींना याचा त्रास होत नाही. सोबतच हार्मोन्सदेखील दिले जातात. त्यामुळे त्यांचे स्नायू स्थूल बनतात. यासर्व उपचारांमुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेत बदल होऊ शकतो.
                                                              – डॉ. भूषण पाटील,
                                             प्लास्टिक अ‍ॅन्ड कॉस्मेटिक सर्जन, पिंपळे सौदागर.

Back to top button