दिल्ली गारठली: तापमान ५.३ अंशावर ; शाळांच्या वेळापत्रकात बदल (Cold Wave In North India) | पुढारी

दिल्ली गारठली: तापमान ५.३ अंशावर ; शाळांच्या वेळापत्रकात बदल (Cold Wave In North India)

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह उत्तर भारतातील राज्यांना थंडीच्या लाटेचा (Cold Wave In North India) सामना करावा लागत आहे. दिल्लीचे सोमवारी ५.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली. तर कमाल तापमान १९ अंश सेल्सियस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नोएडातील शाळांनी इयत्ता ८ वी पर्यंतचे वर्ग सकाळी ८ ऐवजी ९ पासून भरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गाझियाबादमधील शाळांची वेळ सकाळी १० पासून दुपारी ३ पर्यंत करण्यात आली आहे. थंडीच्या लाटेचा प्रकोप आणखी वाढणार असल्याचे लक्षात घेता १ ते १२ जानेवारी पर्यंत दिल्ली सरकारने शाळांना हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी सकाळी कार्यालयीन कामकाजासाठी निघालेल्या लोकांना दाट धुक्याचा  (Cold Wave In North India) सामना करावा लागला. सकाळी ८ वाजता लोकांना लाईट लावून वाहने चालवावी लागली. उद्या, मंगळवारी देखील दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान तसेच चंदीगढ मध्ये थंडीच्या लाटेचा प्रकोप राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी दिल्लीसह उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये तापमानात ३ ते ७ अंश सेल्सियस पर्यंत घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री पडत असलेल्या धुक्यांचा सरकारी बस सेवेवर प्रभाव पडला आहे. धुक्यामुळे महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी रात्रीच्या बस संचालन तूर्त थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळतेय. बुधवारपासून धुक्यामध्ये थोडीफार घट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button