Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात पाय घसरून पडले, उपचाराकरिता मुंबईला रवाना | पुढारी

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात पाय घसरून पडले, उपचाराकरिता मुंबईला रवाना

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आज पहाटे मॉर्निंग वॉक करण्याकरिता गेले असता पाय घसरून पडले. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. हातात प्रचंड वेदना असलेल्या अवस्थेत त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे हलविण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या.
यापूर्वी त्यांना (Balasaheb Thorat) हिवाळी अधिवेशनासाठी कर्तव्यावर असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासले होते. त्यांना पूढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर रुग्णालयात थोरात यांच्या भेटीसाठी गेले होते.

/div>

हेही वाचा 

Back to top button