अवसरी खुर्द येथील वीज ग्राहक कार्यालयात धडकले | पुढारी

अवसरी खुर्द येथील वीज ग्राहक कार्यालयात धडकले

मंचर (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अवसरी खुर्द येथे घरगुती ग्राहकांना योग्य व अचूक बिल देण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने मीटरचे फोटो रीडिंग घेण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. असे असतानाही घरगुती वीज ग्राहकांना अचूक फोटो रीडिंग उपलब्ध होत नाही. मीटर नादुरुस्त असल्याचे कारण सांगून भरमसाठ अंदाजे दिले जात असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

मंचर येथे विद्युत वितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्र अंतर्गत अवसरी खुर्द, गावडेवाडी अवसरी बुद्रुक, टावरेवाडी ही चार गावे येत असून अंदाजे चार हजार घरगुती व कृषीपंपाची पंधराशे ग्राहक आहेत. या घरगुती वीज ग्राहकांकडे महावितरण कंपनी हलक्या दर्जाचे मीटर खरेदी करून लावूत देत असून ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याचा संशय येत आहे. दरम्यान ग्राहकांची आर्थिक लूट व योग्य अचूक बिल न दिल्यास मंचर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला आहे.

आंबेगाव तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीने घरगुती वीज ग्राहकांना योग्य व अचूक बिल देण्यासाठी मीटर फोटो रीडिंग घेऊन बिल देणे चालू केले. ग्राहकांच्या घरी गेल्यावर घर बंद असल्याने मीटरचा फोटो रीडिंग घेता येत नव्हते. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने अवसरी उपकेंद्रांतर्गत असलेले चार हजार मीटर घराबाहेर दर्शनी भागावर लावले. तरी सुद्धा ग्राहकांना फोटो रीडिंग न घेता अंदाजे बिल दिले जात आहे. ग्राहकांना दर महिन्याला दोन ते तीन हजार रुपये अंदाजे बिल दिले जाते. ज्यादा आलेले बिल कमी करण्यासाठी मंचर, अवसरी खुर्द येथील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने ग्राहक वैतागले आहेत.

Back to top button