Visually impaired girls walk the ramp : दृष्टीहीन मुलींचा रॅम्पवॉक पाहून तुम्हीही म्हणालं, वाह क्या बात है… (व्हिडिओ) | पुढारी

Visually impaired girls walk the ramp : दृष्टीहीन मुलींचा रॅम्पवॉक पाहून तुम्हीही म्हणालं, वाह क्या बात है... (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही आतापर्यंत अनेक रॅम्पवॉक (Ramp Walk) पाहिले असतील. पण तुम्ही कधी दृष्टीहीन मुली (Visually impaired girls walk the ramp) आत्मविश्वासाने रॅम्पवॉक करताना पाहिलं आहे का? तर असाच एक रॅम्पवॉक सध्या चर्चेत आहेत.    रॅम्पवॉकवर असं भारावून जाणारं दृश्य गुजरातमधील राजकोटमध्ये पाहायला मिळालं. जिथे चकाकणाऱ्या लाइट्समध्ये काही मॉडेल रॅम्पवॉक करताना दिसल्या. त्या रॅम्पवॉकवर चालताना प्रेक्षक उभे राहून अखंड टाळ्या वाजवत असल्याचे व्हिडिओत दिसते.

आत्मविश्वास असावा तर असा…

गुजरातमधील राजकोटमध्ये एक फॅशन शो झाला. तुम्ही म्हणालं त्यात काय विशेष. असे बरेच रॅम्पवॉक होत असतात. तर जेव्हा तुम्ही हा रॅम्पवॉक पाहिला तर तुम्हाला नक्की वाटेल बहुत बढिया! तर रॅम्पवॉकवर चालणाऱ्या मुली या दृष्टीहीन आहेत. अगदी आत्मविश्वासाने त्या चालत होत्या. राजकोटमधील इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड ज्वेलरी डिझाईनने हा फॅशन शो आयोजित केला होता. जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला नक्की जाणवेल. या मुली अगदी सफाईदारपणे रॅम्पवॉक करताना दिसत आहेत.

Visually impaired girls
Visually impaired girls

फॅशन शोमध्ये सहभागी झालेली जान्हवी सागते,” मला फॅशन शोमध्ये सहभागी होताना आनंद झाला. आम्ही 15-20 दिवस सराव करत होतो. इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड ज्वेलरी डिझाईनच्या टीम सदस्यांनी आमचा सराव केला, त्यांनी आम्हाला सर्व काही खूप चांगले शिकवले. आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो

हेही वाचा

Back to top button