पिंपरी : पालखीच्या म्युरल्समुळे बसस्थानकाला स्मार्ट लूक | पुढारी

पिंपरी : पालखीच्या म्युरल्समुळे बसस्थानकाला स्मार्ट लूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवडगावातील शहिद अशोक कामठे बसस्थानकावर विठ्ठल व पालखीचे म्युरल्स लावण्यात आले आहे. यामुळे बसस्थानकाचे सुशोभीकरण होऊन स्मार्ट लूक आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात विकासकामांमध्ये चिंचवड येथील बसथांब्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पूर्वी बसण्यास आसन व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात व पावसात ताटकळत बसची वाट पाहवी लागत होती.

मात्र, आता मोठ्या आकारातील जास्त आसनसंख्या असलेले नवीन बसशेड दोन्ही बाजूस उभारण्यात आहे आहेत. यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. याबरोबरच बसस्थानकाजवळ पालखीचे म्युरल्स लावण्यात आले आहे. त्यामुळे बस स्थानकचा लुक बदलला आहे.

Back to top button