Balu Dhanorkar : राज्यातील वातावरण दूषित करण्याचे भाजपचा प्रयत्‍न : बाळू धानोरकर | पुढारी

Balu Dhanorkar : राज्यातील वातावरण दूषित करण्याचे भाजपचा प्रयत्‍न : बाळू धानोरकर

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले महाराष्ट्राची दैवते आहेत. परंतु, याच दैवतांविषयी भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार आक्षेपार्ह विधान करीत आहेत. राज्यातील वातावरण दूषित करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी केला.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांविषयी सातत्याने होणाऱ्या अपमानजनक वक्तव्याविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज ( दि.१७) दुपारी कस्तुरबा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.  काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. तसेच भाजप नेत्यांच्या प्रतिमांची गाढवावरून धिंड काढली.  या प्रश्‍नी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, प्रदेश सचिव विजय नळे, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अडूर, घुगूस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी, सेवादलचे अध्यक्ष नंदू खनके, मनपाचे माजी विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुळकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनी खोब्रागडे, माजी सभापती संतोष लहामगे, माजी महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, सेवादलाच्या स्वाती त्रिवेदी, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button