चंद्रकांत पाटील झाले सावध, पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानं पवना थडी जत्रेमध्ये फेसशिल्ड लावून हजेरी | पुढारी

चंद्रकांत पाटील झाले सावध, पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानं पवना थडी जत्रेमध्ये फेसशिल्ड लावून हजेरी

पुढारी ऑनलाईन: शाईफेक प्रकरणानंतर पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता सावध राहत खबरदारी घेतलेली दिसत आहे. चंद्रकांत पाटलांनी पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानं सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना फेस शिल्डचा वापर केला आहे. सांगवी येथे ते फेस शिल्ड लावत पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला हजर झाले. शनिवारी त्यांना सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाटील यांनी फेस शिल्डचा वापर केला. आज शहरात मात्र त्यांच्या या फेस शिल्डची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

दरवर्षी पुण्यात पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. या जत्रेत राज्यातून अनेक लहान मोठे उद्योग सहभागी होत ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं पुणेकरांना दर्शन घडवतात. याच जत्रेचं उद्घाटन करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगवी येथे हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमापूर्वी त्यांना सोशल मीडियावर शाईफेकीची धमकी आली होती. फेसबुकवर पोस्ट करत दोन व्यक्तींनी ही धमकी देण्यात आली होती. त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं नसल्याने शाईफेकीची शक्यता होती. यामुळे मँडरी चंद्रकांत पाटलांनी खबरदारी म्हणून फेस शिल्ड लावत उद्घाटन केलं.

तक्रारीवरुन गुन्हा दाखल

चंद्रकांत पाटील यांना धमकी देताना ‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.’ पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकण्यात आलेली होती. धमकीची ही फेसबुक पोस्ट करणाऱ्या विकास लोले आणि दशरथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. फेसबुक पोस्ट करणारा विकास लोले हा चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा अध्यक्ष असल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे.

Back to top button