Iran Anti-Hijab Protests : इराणच्या फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा; हिजाब आंदोलनात सहभाग घेणे पडले महागात | पुढारी

Iran Anti-Hijab Protests : इराणच्या फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा; हिजाब आंदोलनात सहभाग घेणे पडले महागात

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणचा युवा फुटबॉलपटू अमीर नसर-अजदानी याने देशव्यापी हिजाब विरोधी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. यामुळे इराण सरकारने नसर-अजदानीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Iran Anti-Hijab Protests)

नसर-आझादानीने थोड्या वेळासाठी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. यामुळे नसर-अजादानीवर मोहरे बेहच्या गुन्ह्याचा, म्हणजेच देवाशी शत्रुत्वाचा आरोप लावण्यात आला, ज्याची शिक्षा मृत्युदंड आहे. यामुळे त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. (Iran Anti-Hijab Protests)

फिफ्प्रो या व्यावसायिक फुटबॉल खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने अमीर नसर-अजदानीच्या फाशीच्या शिक्षेविरोधात आवाज उठवला आहे. व्यावसायिक फुटबॉल खेळाडू अमीर नसर-अजादानी याला इराणमध्ये आपल्या देशात महिलांच्या हक्कांसाठी आणि मूलभूत स्वातंत्र्यांसाठी मोहीम चालवल्याबद्दल फाशीची शिक्षा भोगावी लागत असल्याच्या बातमीने FIFPro ला खूप धक्का बसला आहे. संघटनेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आम्ही आमिरच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत आणि त्याची शिक्षा त्वरित रद्द करण्याची मागणी करतो.

सप्टेंबरमध्ये इराणच्या पोलीस कोठडीत झालेल्या दुखापतींमुळे २२ वर्षीय महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये आंदोलनास सुरूवात झाली. महसा अमिनीला राजधानी तेहरानच्या भेटीदरम्यान हिजाब व्यवस्थित न घातल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर, हिजाबविरोधी निदर्शने इराणमध्ये वणव्यासारखी पसरली. इराणमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिजाबचा वाद सुरू आहे. या वादात सहभागी असल्याबद्दल इराण सरकारने अनेकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा;

Back to top button