Gujrat Election 2022 : पंतप्रधान मोदींनी गुजरातचे आभार मानत भ्रष्टाचारासह घराणेशाहीला केले लक्ष्य | पुढारी

Gujrat Election 2022 : पंतप्रधान मोदींनी गुजरातचे आभार मानत भ्रष्टाचारासह घराणेशाहीला केले लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वात आणि भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे भाजपला गुजरातमध्ये मोठा विजय मिळवता आला. असे म्हणत गुजरातच्या जनतेससमोर नतमस्तक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराच्या जनतेचे आभार मानले. तसेच गुजरातच्या जनतेने भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला नाकारल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. (Gujrat Election 2022) गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपने दिल्लीतील पक्ष कार्यालयात विजयोत्सव सुरू केला आहे. या वेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो. निवडणूक आयोगाने घेतलेल्या अथक परिश्रमामुळे या निवडणुका सुरळीत पार पडल्या. तसेच हिमाचल प्रदेशच्या मतदारांचाही मी आभारी आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष फक्त १ टक्क्याने मागे राहिला. मी हिमाचल प्रदेशच्या लोकांना आश्वासन देतो की, भाजपला सत्ता मिळाली नसली तरी, आम्ही विकास करण्यासाठी कटीबद्ध राहू. केंद्र सरकारकडून हिमाचलच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. (Gujrat Election 2022)

भाजपला मिळालेले समर्थन महत्वपूर्ण आहे. कारण भारत अमृतमहोत्सवी वर्षांत आहे. पुढील २५ वर्षांत विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. भाजपवर दलित, वंचित, पीडित या सर्वांनी विश्वास दाखवला आहे. भाजपने देशासाठी अनेक चांगले निर्णय घेतले, त्यामुळेच लोकांनी भाजपला मतदान केले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. (Gujrat Election 2022)

पुढे बोलताना मोदी म्हणाले, भाजपला मिळालेले समर्थन दाखवते की, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा आक्रोश वाढत आहे. ही लोकशाहीसाठी चांगली बाब आहे. मी यासाठी जे.पी.नड्डा यांच्या बरोबरचं सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. यावेळी मोदींनी गुजरातच्या जनतेचेही आभार मानले. मी गुजरातच्या जनतेला नरेंद्रचे जनतेचे रेकॉर्ड मोडण्याचे आवाहन केले होते. गुजरातच्या जनतेने इतिहासातील सर्वांत मोठे बहुमत भाजपला दिले आहे. अडिच दशक सत्तेत राहिल्यानंतरही जनतेने भाजपलाच पसंती दिली आहे. जात, वर्ग विसरून लोकांनी भाजपला मतदान केले आहे, असेही नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. (Gujrat Election 2022)

हेही वाचलंत का?

Back to top button