Gujarat Elections result : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ४१ हजारांच्या मताधिक्याने विजयी | पुढारी

Gujarat Elections result : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ४१ हजारांच्या मताधिक्याने विजयी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील जामनगर उत्तर मतदारसंघातून  (Gujarat Elections result) क्रिकेटर रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांनी विजय मिळवला. रिवाबा जडेजा यांनी काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांच्यावर 40,963 मतांनी विजय मिळवला. एकूण मतदानांपैकी 65.5 टक्के मते भाजपला मिळाली. या विधानसभा मतदारसंघात एकूण 2,63,483 मते आहेत. त्यापैकी 1,34,765 पुरुष तर 1,28,717 महिला मतदार आहेत.

मला उमेदवार म्हणून जनतेने आनंदाने स्वीकारले. माझ्यासाठी काम केले, लोकांशी संपर्क साधला, मी त्या सर्व मतदारांचे आभार मानते. हा केवळ माझाच नाही, तर आपल्या सर्वांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया रिवाबा जडेजा यांनी विजयानंतर (Gujarat Elections result) दिली.

रिवाबा यापूर्वी करणी सेनेच्या सदस्या होत्या. 2018 मध्ये त्यांची करणी सेनेच्या महिला शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. भाजपने आमदार धर्मेंद्रसिंह एम. जडेजा यांचे तिकीट कापून जामनगरमधून रिवाबा यांना तिकीट दिले होते. रिवाबा जडेजाने ही जागा जिंकून पक्षाचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. जामनगर उत्तरमध्ये १ डिसेंबर रोजी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात जामनगर शहरात सरासरी एकूण मतदानापेक्षा कमी मतदान झाले होते. २०१७ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून धर्मेंद्रसिंह जडेजा (हकुभा) यांनी विजय मिळवला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button