Largest Continent : पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता? | पुढारी

Largest Continent : पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता?

वॉशिंग्टन : कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एकच खंड होता व त्याचे नाव होते ‘पँजिया’. 12 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी या भूतलावरील जवळजवळ सर्व कोरडी भूमी याच खंडामध्ये समाविष्ट होती. कालांतराने या खंडाचे विघटन झाले व ते वेगवेगळ्या दिशेने सरकत गेले. त्यामधूनच सध्याचे ‘काँटिनंटस्’ म्हणजेच खंड निर्माण झाले. यापैकी कोणता सर्वात मोठा आणि कोणता सर्वात लहान आहे याबाबत अनेकांना कुतुहल असते.

Largest Continent : सर्वात मोठा खंड  ‘आशिया’

‘सीआयए वर्ल्ड फॅक्टबुक’नुसार जगातील सर्वात मोठा खंड ( Largest Continent ) ‘आशिया’ आहे. हा खंड 4 कोटी 40 लाख चौरस किलोमीटरचा आहे. त्यानंतर क्रमांक लागतो आफ्रिकेचा. आफ्रिकेनंतर दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. मात्र, त्यांची जशी विभागणी झाली आहे तशी अनेकांना मान्यही असत नाही.

इसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकातील ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यानेही याबाबत प्रश्न विचारले होते. 1997 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द मिथ ऑफ काँटिनंटस्, ए क्रिटिक मेटाजिओग्राफी’ या पुस्तकात म्हटले आहे की खंडांची विभागणी ही प्रामुख्याने परंपरा आणि संस्कृतीच्या पायावर झालेली आहे.

आज पाहिले तर युरोप आणि आशिया हे दोन खंड एकमेकांशी तसे जोडलेलेच आहेत आणि त्याला ‘युरेशिया’ असेही म्हटले जाते. अनेकजण उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे दोन नव्हे तर एकच खंड मानतात. ‘खंड’ म्हणजे पाण्याने वेढलेला जमिनीचा मोठा तुकडा. त्याद़ृष्टीने पाहिल्यास ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान आकाराचा खंड ठरतो. तो 80 लाख चौरस किलोमीटर आकाराचा आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button