

पुढारी ऑनलाईन डेस्क : उंट सवारी करण्याचा मोह सर्वांनाच होतो. उंट सवारीची संधी मिळाली तर उत्साही मंडळ लगेच सरसावतात. काही जणांना तर याचा छंदही असतो तर काहींना उंटावर बसण्याचा विचारानेही घाम फुटतो. असाच उंटावर दोघा जणांनी बसण्याच्या धडपडीचा व्हिडिओ ( Funny Viral Video ) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहात तुम्हीही पोटभरुन हसाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल , एक उंट निवांत बसला आहे. यावर जाडजूट व्यक्ती घाबरत घाबरत बसतो. हे कमी की काय म्हणून, त्याच्या पाठोपाठ आणखी एकजण उंटावर सवार होतो. यानंतर जवळच उभा असणारा एकजण उंटाला उभे करण्याचा प्रयत्न करतो. अतिरिक्त वजन झाल्याने बिचारा उंट आपलं संतुलन हरवतो आणि आणि उंटावर बसलेले दोघेजण अत्यंत वाईट पद्धतीने तोंडावर आपटतात. या घटनेनंतर तोंडावर आपटलेले दोघे जण पुन्हा कधीच उंटाची सवारी करण्याचे धाडस करतील असे वाटत नाही.
उंटावर सवारीचा फसलेल्या प्रयत्नाचा हा व्हिडीओ आयपीएस रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. सध्या तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा :