पाकिस्तानी, चिनी ड्रोन पंजा मारून पाडणार ‘अर्जुन’, म्हणायला ससाणा, पण आहे फार शहाणा! | पुढारी

पाकिस्तानी, चिनी ड्रोन पंजा मारून पाडणार ‘अर्जुन’, म्हणायला ससाणा, पण आहे फार शहाणा!

डेहराडून; वृत्तसंस्था :  उत्तराखंडातील औली भागात भारतीय व अमेरिकन जवानांच्या संयुक्त युद्ध सरावात अर्जुन नावाचा ससाणा खास आकर्षण ठरला. अर्जुनच्या डोक्यावर कॅमेरा लावलेला आहे. हा कॅमेरा आणि एका प्रशिक्षित श्वानाच्या मदतीने त्याने आकाशात उडत असलेला ड्रोन पंजा मारून खाली पाडला. एलएसीवर चिनी हवाई हालचालींची पाहणी करण्यासाठी इथून पुढे काही दिवस आता ‘अर्जुन’ची नियुक्ती होणार आहे. पाक सीमेवरही वेळोवेळी अर्जुन आपली करामत दाखवणार आहे.

arjun

‘अर्जुन’ची अर्जित वैशिष्ट्ये काय?

  • ‘युरेशियन टाईम्स’ने आपल्या वृत्तात अर्जुनच्या शरीरात जीपीएस असल्याचा दावा केला आहे.
  • उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये अर्जुनला प्रशिक्षण मिळाले.
  •  पंजा मारून शत्रूचे ड्रोन पाडण्यासह डोक्यावरील कॅमेर्‍याच्या मदतीने शत्रूच्या आकाशातील व जमिनीवरील हालचाली टिपण्यातही अर्जुन तरबेज बनलेला आहे.
  •  अर्जुन नेमका कुठे आहे, ते लष्कराला कळावे म्हणून त्याच्या शरीरात जीपीएस बसवलेला आहे. थोडक्यात, अर्जुन हा केवळ एक ससाणा नव्हे ती एक ‘जिती जागती अँटी ड्रोन सिस्टीम’ आहे!

      काय दिसले प्रात्यक्षिकात?

  •  अर्जुन हा ससाणा एका भारतीय जवानाच्या हातावर बसलेला होता. लगतच प्रशिक्षित श्वान होता. तेवढ्यात आकाशात एक ड्रोन उडत येतो.
  •   ड्रोनचा आवाज कानी पडताच श्वान ‘अर्जुन’कडे बघून भुंकायला लागतो.
  •   पापणी लवते न लवते तोच ‘अर्जुन’ भरारी घेतो आणि आपल्या पंजाने ड्रोन पाडून टाकतो.
  •   अर्जुन आणि लष्कराचे प्रशिक्षित श्वान आता सीमेला लागून असलेल्या भागात टेहळणी करतील.

 

अर्जुन

     ‘अर्जुन’चे उपजत गुण कोणते?

  •  ससाण्याची नजर 3.2 कि.मी. अंतरावरील एखाद्या सशाचाही वेध घेऊ शकते.
  • उडण्याचा वेग ताशी 320 कि.मी. आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातूनही भारतीय हद्दीत ड्रोनने ड्रग्ज, शस्त्रे टाकण्यात येत आहेत. अर्जुनसारखी अँटी ड्रोन सिस्टीम त्यावर एक चांगला उपाय ठरेल.
– सुधीर चमोली,
प्रवक्ता, भारतीय लष्कर

Back to top button