Stock Market Updates | सेन्सेक्सने गाठली विक्रमी पातळी, ७६२ अंकांनी वाढून ६२,२७२ वर बंद
Stock Market Updates : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नोव्हेंबरच्या पतधोरण बैठकीत व्याजदर वाढीवर नियंत्रण राहणार असल्याचे संकेत दिले. यामुळे आज गुरुवारी (दि.२४) भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार होऊन सेन्सेक्सने विक्रमी पातळी गाठली. आज सेन्सेक्स ७६२ अंकांनी वाढून ६२,२७२ वर बंद झाला. तर निफ्टी २१६ अंकांनी वाढून १८,४८४ वर बंद झाला. आजच्या सत्रात सेन्सेक्सची ९०० अंकांपर्यंत उसळी पहायला मिळाली. तर निफ्टीने ५२ आठवड्यातील उच्चांक नोंदवला.
आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २८० अंकांनी वधारून ६१,८०० वर गेला. तर निफ्टी ८२ अंकांनी वाढून १८,३०० वर पोहोचला. त्यानंतर ही तेजी वाढत गेली. बीएसईवर १,७२६ शेअर्स वाढले तर ६४३ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, यूपीएल, एचडीएफसी लाईफ, बीपीसीएल आणि एम अँड एम यांचे शेअर्स आज एनएसई प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक २.६३ टक्क्यांपर्यंत वाढले.
अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स निफ्टीवर आघाडीवर होते. अपोलोचा शेअर ४.५६ टक्क्यांनी वाढून ४,८१५ रुपयांवर बंद झाला. एचडीएफसी लाईफ, बीपीसीएल, इन्फोसिस आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सचे शेअर्सही वधारले. तर सिप्ला, कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक आणि टाटा मोटर्स टॉप लुजर्सच्या यादीत होते.
अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी आल्यामुळे आशियाई शेअर्सही वधारले आहेत. जपानचा निक्केई निर्देशांक १.१७ टक्क्यांनी वाढला. दक्षिण कोरियाचा KOSPI ०.५५ टक्क्यांनी आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.००२ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.४३ टक्क्यांनी वधारला.
NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ७९० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. तर स्थानिक गुंतवणूकदारांनी ४१४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Stock Market Updates)
Sensex rallies 762.10 points to settle at all-time high of 62,272.68; Nifty jumps 216.85 points to 18,484.10
— Press Trust of India (@PTI_News) November 24, 2022
हे ही वाचा :