नाशिकमध्ये 1 डिंसेबरपासून हेल्मेट सक्ती, न घातल्यास होणार दंड | पुढारी

नाशिकमध्ये 1 डिंसेबरपासून हेल्मेट सक्ती, न घातल्यास होणार दंड

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिकमध्ये 1 डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती बंधनकारक करण्यात आली आहे. हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होण्यासोबतच दुचाकीस्वारांकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या काळात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र पांडेय यांची बदली झाल्यानंतर हेल्मेटसक्तीची मोहीम थंडावली होती. मात्र, आता नाशिककरांना पु्न्हा एकदा हेल्मेटसक्तीला सामोरे जावे लागणार आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हेल्मेट सक्तीची मोहीम हाती घेतली आहे. हेल्मेटसक्तीचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढल्याने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचा मुद्दा गाजणार आहे.

हेल्मेट न घातल्यामुळे चालु वर्षात आतापर्यंत 83 दुचाकीस्वारांचा मृत्यू व 261 जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.  त्यामुळे नाशिककरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुन्हा एकदा ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, या मोहीमेला नाशिककरांचा कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहावे लागणार आहे.

Back to top button