Cheque Books Unvalid : या तीन बँकांचे चेक बुक होणार रद्द | पुढारी

Cheque Books Unvalid : या तीन बँकांचे चेक बुक होणार रद्द

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Cheque Books Unvalid 1st October 2021 : देशातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण झाले असून त्यांची कार्यवाही आता सुरु झाली आहे. याचबरोबर जुना चेक, IFSC कोड आणि बँकेचा MICR कोड देखील बदलला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जुन्या चेकने व्यवहार करत असाल तर तो चेक बाउन्स होऊ शकते. (cheque books unvalid 1st october 2021 checkbooks of these three banks will be invalid from october 1 there may be trouble in banking transactions)

जर तुम्ही जुन्या IFSC कोडचा वापर करून नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करत असाल तर हा व्यवहार अयशस्वी होऊ शकतो.

दरम्यान, तीन बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. १ ऑक्टोबरपासून जुने चेकबुक अवैध ठरू शकते. (Bank Cheque Books Unvalid).

१५ दिवसांनंतर म्हणजे ३० सप्टेंबरपासून, अलाहाबाद बँक (Allahabad Bank), ओरिएंटल बँक (Oriental bank) आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची (United Bank of India) जुनी चेकबुक अवैध ठरणार आहेत.

ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झाले असल्याची माहिती आहे.

बँकाच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर सुमारे दोन वर्षांत कार्यवाही सुरू झाली आहे.

अलाहाबाद बँकेचा MICR कोड आणि चेक बुक फक्त ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध आहे.

जुना MICR कोड आणि चेक बुक १ ऑक्टोबर २०२१ पासून अवैध होईल.

त्यामुळे बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी नवीन चेक बुक घ्यावे.

ग्राहक स्वतःच बँक शाखेला भेट देऊन चेक बुक घेऊ शकतात किंवा ते ऑनलाईन (Internet Banking, Online Banking) मागणी करू शकतात.

ग्राहकांना नवीन चेक बुक मिळवावे लागेल

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) माहितीनुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँकेची जुनी चेकबुक ३० सप्टेंबरनंतर अवैध होतील. १ ऑक्टोबर २०२१ पूर्वी ग्राहकांना नवीन चेक बुक मिळवावे लागेल.

ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की या दोन बँकांचे जुने चेक बुक बदलून नवीन चेकबुकसह IFSC कोड आणि PNB चा MICR कोड घेण्यात यावा असे सांगण्यात आले.

चेकबुकसाठी इंटरनेट बँकिंग किंवा पीएनबी वन सेवेचा उपयोग करण्याचे आवाहन पंजाब नॅशनल बँकेकडून करण्यात आले आहे.

Back to top button