रंग माझा वेगळा : दुरावलेल्या दीपा-कार्तिक यांना मुली एकत्र आणणार का? - पुढारी

रंग माझा वेगळा : दुरावलेल्या दीपा-कार्तिक यांना मुली एकत्र आणणार का?

पुढारी ऑनलाईन : स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. दीपा-कार्तिक यांच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकी असं या दोघींचं नाव आहे. आता दुरावलेल्या दीपा-कार्तिक यांना दोघी एकत्र आणणार का याची उत्सुकता वाढली आहे.

चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीला आपण याआधी काही भागांमधून भेटलोच आहे. आता लीपनंतर मोठ्या झालेल्या दीपिका-कार्तिकीला २० सप्टेंबरच्या विशेष भागातून भेटण्याची संधी मिळणार आहे.

सध्या या दोघींच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळत असून दोघींची सेटवर खूप छान गट्टी जमली आहे. दोन्ही मुख्य कलाकारही या छोट्या दोस्तांना भेटून खुश आहेत.

तिने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. असे असले तरी दोन्ही मुली दोन वेगळ्या घरात वाढत आहेत. कार्तिकने मुलींचं पितृत्व नाकारले. पण, तिने एकटीने मुलीला वाढण्याचा निर्धार केला आहे. तर सौंदर्याने दुसरी मुलगी आपल्या घरी वाढवलीय. दोन्ही मुली वेगवेगळ्या घरात वाढत आहे.

आता या दोन चिमुकली त्या दोघांना पुन्हा एकत्र आणणार का? हे पाहणं उत्सुकतेचं असेल. मालिकेचे यापुढील भाग अतिशय रंगतदार असणार यात शंका नाही.

तेव्हा पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेही वाचलं का ? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Back to top button