

पुढारी ऑनलाईन : गणेशभक्तांच्या भेटीसाठी एकामागोमाग एक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक असलेली ही गाणी प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करून सोडत आहेत. अशाच एका 'तू गणराया' या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोकाच चुकविला आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं आहे. सिद्धार्थ खिरिद आणि पायल कबरे यांनी या गाण्यात अभिनय आणि नृत्याच्या जोरावर गाण्याची शोभा वाढविली.
'स्वप्न स्वरुप प्रॉडक्शन'ची निर्मिती आहे. सचिन आंबात यांनी हे गाणे दिग्दर्शित केलं आहे.
'तू गणराया' गाण्याचे पोस्टर माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले.
विनोद तावडे यांनी देखील गाण्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी दमदार कलाकारांना घेऊन चित्रित केलेल्या या गाण्याचे कौतुकचं केले आहे.
'तू गणराया' या गाण्यामधे एका नवविवाहित जोडप्याने गणरायाच्या आगमनाची तयारी कशी केली, हे दाखवण्यात आलंय.
शिवाय अतुट नातं जपत, बायकोला प्रोत्साहन देत एका नवीन परंपरेचा श्री गणेशा या गाण्यातून सादर केला.
सचिन आंबात यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.
गायिका स्नेहा महाडिक आणि गायक रोहित ननवरे यांनी स्वरसाज चढविला आहे.
रोहित ननवरे यांनी या गाण्याला संगीतबद्ध देखील केले आहे.
या गाण्याची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
'स्वप्न स्वरूप' युट्युब चॅनेलवर याचा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत आहेत.
गाण्याने तब्बल १ लाखांहून अधिक व्ह्यूव्ह्जचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडिओ- Tu Ganaraya – Official song | Siddharth Khirid | Payal Kabre | Sachin Ramchandra Ambat