देहूरोड बाजारपेठेत पुन्हा हातगाड्यांचा शिरकाव | पुढारी

देहूरोड बाजारपेठेत पुन्हा हातगाड्यांचा शिरकाव

देहूरोड : देहूरोड बाजारपेठेत लागणार्‍या हातगाड्या, रिक्षा यांना मज्जाव करून त्यांना स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. परंतु, सध्या भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या पुन्हा लागू लागल्या आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वतंत्र जागा देऊनही पुन्हा हातागाडया, पथारीवाले व रिक्षा चालक बाजारपेठेत कोठेही रिक्षा लावताना दिसत आहेत. सायंकाळी पाच वाजल्यानंतर त्यांची मनमानी दिसून येते.

बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार तांबे यांनी आदेश दिल्यानंतर हातगाड्यांना पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयासमोर जागा देण्यात आली आहे. पण हे हातगाडीचालक बाजारपेठेतच आपला व्यवसाय करतात. नागरिकांची कारवाईची मागणी सायंकाळी पाचपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पथक फिरत असल्याने ते इकडे-तिकडे व्यवसाय करतात अणि पाचनंतर बाजारात येतात. या प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

Back to top button