कर्नाटक : मंगळूरमध्ये रिक्षात संशयास्पद स्फोट; दहशतवादी कृत्य असल्याचा पोलिसांचा संशय | पुढारी

कर्नाटक : मंगळूरमध्ये रिक्षात संशयास्पद स्फोट; दहशतवादी कृत्य असल्याचा पोलिसांचा संशय

पुढारी ऑनलाईन: कर्नाटकातील मंगळूर येथे शनिवारी (दि.१९) एका रिक्षात संशयास्पद स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत रिक्षाचालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास केल्यानंतर, हा स्फोट ‘दहशतवादी कृत्य’ असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर माहिती दिली आहे की, हा स्फोट अपघाती नसून गंभीर नुकसान करण्याच्या उद्देशाने केलेले ‘दहशतवादी कृत्य’ आहे. कर्नाटक राज्य पोलीस केंद्रीय एजन्सींसोबत चर्चा करून या घटनेची कसून चौकशी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे की, या घटनेचे कारण तपासण्यासाठी आम्ही विशेष टीम आणि एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅब) टीमला पाचारण केले आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याहीप्रकारे गोंधळ घालण्याची आणि अफवा पसरवू नये, असे अवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहेत.

हेही वाचा:

Back to top button