लोणी : वीस लाखासाठी विवाहितेचा छळ | पुढारी

लोणी : वीस लाखासाठी विवाहितेचा छळ

लोणी : पुढारी वृत्तसेवा : शोरूमसाठी 20 लाख रुपयांची मागणी करून विवाहितेचा छळ करणार्‍या सासर मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लोणी बुद्रुक येथील बाळासाहेब नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेने जामखेड येथील सासरच्या मंडळीविरुद्ध लोणी पोलिसात फिर्याद दिली आहे. सपना वेदांत दळवी, वय-21 रा. लोणी बुद्रुक, बाळासाहेब नगर) या विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, (दि. 11 डिसेंबर 2019) रोजी लोणी येथे वेदांत अंकुश दळवी यांच्यासोबत विवाह झाला.

विवाहनंतर महिन्याच्या आत सासरच्यांनी मला पैशाची मागणी करून त्रास देण्यास सुरुवात केली. वडिलांनी सासरी येऊन पतीला सांगितले, ‘आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे पैसे देणे शक्य नाही. यानंतर पतीकडून त्रास सुरू झाला. पती अनोळखी महिलेशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे. आठवड्यातून दोन- तीन दिवस मला काम आहे, असे सांगत बाहेर रहायचे. याबाबत सासू, नणंद, दीर यांना सांगितले, परंतु तेही ‘तुझ्या भिकारी घरात आम्ही सोयरीक करून चुक केली,’ असे म्हणत टोमणे मारून मानसिक त्रास देत होते.
विवाहितेच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसात पती वेदांत अंकुश दळवी, सासू कांता अंकुश दळवी, दीर ओंकार अंकुश दळवी, ननंद मधुराणी राजेंद्र राऊत (सर्व रा. जामखेड, ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

Back to top button