निरा- केडगाव मार्गावरील लालपरी बंद | पुढारी

निरा- केडगाव मार्गावरील लालपरी बंद

मोरगाव : बारामती तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून निरा- केडगाव- शिरूर हा ऐतिहासिक रस्ता आहे. या रस्त्याने दक्षिण व उत्तर भारत जोडला जातो. शिरूर- सुपा हा राज्य मार्ग व सुपा- निरा जिल्हा मार्ग आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. परंतु, या मागार्वरील प्रवासी एसटी सेवेला प्रतिसाद देत नसल्याने वाढत्या तोट्यामुळे या मार्गावर एसटी बस सुरू करण्यात आलेली नाही.

याबाबत पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने लालपरी बंद केली आहे. बारामती तालुक्यातील अनेक रस्ते खराब असले तरी एसटी बस सेवा सुरू आहे.

Back to top button