हायपरलूप तंत्रज्ञान भारतात आणण्यास काही विदेशी कंपन्या उत्सूक : व्ही. के. सारस्वत | पुढारी

हायपरलूप तंत्रज्ञान भारतात आणण्यास काही विदेशी कंपन्या उत्सूक : व्ही. के. सारस्वत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हायपरलूप तंत्रज्ञान भारतात आणण्यास काही विदेशी कंपन्या उत्सूक आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. अल्ट्रा हायस्पीड प्रवासाचे तंत्रज्ञान म्हणून हायपरलूप तंत्रज्ञानाकडे पाहिले जाते. हे तंत्रज्ञान भारतात आणण्यास विदेशी कंपन्या उत्सूक असल्या तरी त्यांच्यासोबतची सध्याची चर्चा प्राथमिक स्वरुपाची आहे, असे सारस्वत यांनी स्पष्ट केले.

नीती आयोगाच्या हायपरलूप तंत्रज्ञानविषयक समितीचे प्रमुख असलेल्या सारस्वत यांनी या तंत्रज्ञानाबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असल्याचेही नमूद केले. विदेशात काही कंपन्यांनी हायपरलूप तंत्रज्ञान विकसित केलेले आहे, त्यातील काही कंपन्या भारतात हे तंत्रज्ञान आणण्यास उत्सूक आहेत, असे सारस्वत यांनी नमूद केले.

ट्यूबमधील निर्वात पोकळीद्वारे वेगवान प्रवास घडवून आणण्याच्या दृष्टीने हायपरलूप तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. इलेक्ट्रिक कार निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे मालक एलॉन मस्क हेही हायपरलूप तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. ९ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे पॉडच्या सहाय्याने ५०० मीटर ट्रॅकवर व्हर्जिन हायपरलूपची चाचणी घेण्यात आली होती. महाराष्ट्रात मुंबई ते पुण्यादरम्यान हायपरलूप सेवा सुरु करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरु आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button