Ronaldo vs Manchester United : ‘मँचेस्टर युनायटेड’चा रोनाल्डोला दणका! ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरचे पोस्टर हटवले | पुढारी

Ronaldo vs Manchester United : ‘मँचेस्टर युनायटेड’चा रोनाल्डोला दणका! ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरचे पोस्टर हटवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ronaldo vs Manchester United : मँचेस्टर युनायटेडने धोका दिल्याचा आरोप पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने (ronaldo) ला होता. काही दिवसांपूर्वी रोनाल्डोने एक मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता. कतार येथे फिफा वर्ल्डकप 2022 रविवार, दि. 19 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अनेक देशांचे संघ कतारमध्ये दाखल झाले आहेत. अशातच क्लब फुटबॉलमधील वादाचा वनवा पेटलेला आहे.

रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड क्लबचे व्यवस्थापक एरिक टेन हॅग आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी मला जबरदस्तीने क्लबमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असा दावा केला होता. त्याच्या या खळबळजनक आरोपानंतर इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडने आपले घरचे मैदान ओल्ड ट्रॅफर्डमधून ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (ronaldo) पोस्टर काढून टाकले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये क्रेनच्या मदतीने स्टेडियमबाहेरील पोस्टर काढताना दिसत आहे. या पोस्टरमध्ये रोनाल्डोसह डेव्हिड बेकहॅम आणि ब्रायन रॉबसन यांचाही समावेश आहे. दरम्यान, रोनाल्डोच्या स्फोटक मुलाखतीनंतर निर्माण झालेल्या वादाचा हा परिणाम असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. (manchester united removed ronaldo s poster from the old trafford stadium Ronaldo vs Manchester United)

खरं तर, रोनाल्डोला संघाचे नवे व्यवस्थापक एरिक टॅन हॅग यांच्याशी अनेक दिवसांपासून संघर्षाचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा रोनाल्डोवर अनप्रोफेशनल असल्याचा आरोप करण्यात आला. या मोसमात युनायटेडच्या बहुतांश सामन्यांमध्ये हेग यांनी रोनाल्डोला बेंचवर बसवले. या सर्व प्रकारानंतर रोनाल्डोने नुकतीच ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनला एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने मॅनेजर हॅग  आणि क्लबच्या मालकांवर स्पष्टपणे विविध आरोप केले. आता मुलाखतीनंतर लगेचच क्लबने कारवाईचा बडगा उचलत ओल्ड ट्रॅफर्डवरील रोनाल्डोचे पोस्टर हटवले आहे. यानंतर आणखीच वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (manchester united removed ronaldo s poster from the old trafford stadium Ronaldo vs Manchester United)

दरम्यान, रोनाल्डोची (ronaldo) मुलाखत हे वादाचे कारण नसून रग्बी लीग विश्वचषक असल्याची चर्चा रंगली आहे. खरेतर, पुरुष आणि महिला रग्बी लीग विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी ओल्ड ट्रॅफर्ड येथे 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत रोनाल्डोचे पोस्टर कोणत्याही परिस्थितीत 16 नोव्हेंबरपर्यंत हटवायचा होते, असा दावा केला जात आहे.

पोर्तुगीज खेळाडू रोनाल्डोने गेल्या वर्षी युव्हेंटस क्लब सोडला आणि मँचेस्टर युनायटेडशी करार केला. रोनाल्डो (ronaldo) त्याच्या क्लब कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात 2003 ते 2009 या काळात युनायटेडचा एक भाग होता. तो नेहमी त्याच्या प्रगतीसाठी हा काळ महत्त्वाचा मानतो. मात्र यंदाच्या मोसमात मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी नव्या व्यवस्थापकाची नियुक्ती केल्यापासून रोनाल्डो क्लब सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्याच्या मुलाखतीमुळे फुटबॉल विश्वात आणखी खळबळ माजली आहे.

Back to top button