Sandhya Devanathan मेटाची भारतातील सूत्रे महिलेच्या हाती – संध्या देवंथन यांच्याकडे नवी जबाबदारी | पुढारी

Sandhya Devanathan मेटाची भारतातील सूत्रे महिलेच्या हाती - संध्या देवंथन यांच्याकडे नवी जबाबदारी

मेटाची भारतातील सूत्रे महिलेच्या हाती - देवंथन यांच्याकडे नवी जबाबदारी

दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क – फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाच्या भारताच्या प्रमुख म्हणून संध्या देवंथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संध्या यांच्याकडे मेटाच्या आशिया पॅसिफिकच्या गेमिंग व्यवसायाची जबाबदारी आहे, जानेवारी महिन्यात त्या भारताच्या प्रमुख आणि मेटाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारतील. (Meta Appoints Sandhya Devanathan As India Head)

मेटामधून काही दिवसांपूर्वी ११ हजार कर्मचारी कमी करण्यात आले. त्यानंतर भारताचे प्रमुख अजित मोहन, व्हॉटसअपचे भारताचे प्रमुख अभिजित बोस, सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख राजीव अग्रवाल यांनी काही दिवसापूर्वीच राजीनामा दिला आहे.

संध्या यांनी दिल्ली विद्यापीठातून एमबीएम केले आहे, तसेच आंध्र विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. फेसबुकमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी पेपर फायनान्सियल सर्व्हिसमध्ये संचालक आणि नॅशनल लायब्ररी बोर्डमध्ये काम केले आहे.

हेही वाचा

Back to top button