चंदनापुरी येथे शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू | पुढारी

चंदनापुरी येथे शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील रहिवासी असलेले तसेच संगमनेर येथील दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन एकनाथ दगडू राहणे (भाऊ) वय 75 यांचे चंदनपुरी आपटे मळा येथे आपल्या शेताच्या शेततळ्यामध्ये पाय घसरल्याने पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील रहिवासी असणारे एकनाथ दगडू राहणे ह संगमनेर येथे राहावयास होते.

ते मंगळवारी आपल्या चंदनापुरी गावाला गेले होते. चार वाजेच्या सुमारास ते आपल्या आपटेमळा येथील असणार्‍या शेततळ्यावर चक्कर मारण्यासाठी गेले होते. रात्र होऊ लागली तरी ते घरी का येईना, म्हणून नातेवाईकांनी आसपास शोध घेतला असता शेततळ्याच्या बाहेर त्यांचा बूट आढळून आला. त्यावरून ते शेततळ्यात पडले असावे, असा संशय नातेवाईकांना आला. शेततळ्यात डोकवले असता त्यांचा बुडालेल्या स्थितीत शेतत ळ्यातील पाण्यात आढळून आला.

Back to top button