ट्विटरवरील बनावट खाती होणार कायमची निलंबित; नाव बदलल्यास ब्लू टिक काढणार! | पुढारी

ट्विटरवरील बनावट खाती होणार कायमची निलंबित; नाव बदलल्यास ब्लू टिक काढणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरवरील बनावट खात्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मस्क यांनी याबाबत ट्विट केले आहे. कोणतेही ट्विटर हँडल बनावट असल्याचे आढळल्यास ते निलंबित केले जाईल. याआधी निलंबनापूर्वी एक चेतावणी दिली होती, परंतु आता व्यापक पडताळणी सुरू केल्याने, कोणतीही चेतावणी दिली जाणार नाही. तसेच नाव बदलल्यास ब्लू टिक काढले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर रोज नवीन अपडेट येत आहे. सोमवारी मस्क यांनी ट्विट करत मोठी बातमी दिली आहे. ओळख बदलणारे ट्विटर खाते निलंबित केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पैरोडी अकाउंट असल्यास तसे स्पष्ट लिहिणे गरजेचे आहे, दुसऱ्याच्या नावाचा किंवा फोटोचा वापर करणारी अकाउंट निलंबित केली जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, याआधी ट्विटर हँडलच्या निलंबनापूर्वी चेतावणी दिली होती. पण आता व्यापक पडताळणी सुरू असल्याने खाते थेट निलंबित केले जाईल, हे स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

…तर ब्लू टिक काढली जाईल

जर कोणी ट्विटरचे युजर नेम बदलले तर त्याचे ब्लू टिक तात्पुरते काढून टाकले जाईल. अलीकडेच असेही दिसून आले आहे की, अनेक खाती निलंबित केली आहेत. जी दुसऱ्याची खाती आहेत. पण पैरोडी अकाऊंट म्हणून वापरली जात आहेत. ट्विटरला माहितीचा सर्वात अचूक स्रोत बनण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button