Deltacron update : ‘डेल्टाक्रॉन’ फुफ्फुसावर हल्ला करू शकतो, ओमायक्रॉन सारखा पसरतो : अहवालात सिद्ध | पुढारी

Deltacron update : 'डेल्टाक्रॉन' फुफ्फुसावर हल्ला करू शकतो, ओमायक्रॉन सारखा पसरतो : अहवालात सिद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क : Deltacron update : डेल्टा आणि ओमायक्रॉन एकत्रित असा कोविडचा प्रकार डेल्टाक्रॉन (Deltacron update) जगभरात अनेक ठिकाणी पसरत आहे. अहवालानुसार, या नवीन स्ट्रेनमध्ये फुफ्फुसांवर हल्ला करण्याची क्षमता आहे आणि हा ओमायक्रॉन प्रमाणे सहजपणे पसरतो. भारतात ‘डेल्टाक्रॉन’ची एकही केस अद्याप सापडलेली नाही. फॉर्च्युन वेलच्या अहवालानूसार ‘डेल्टाक्रॉन’ चे प्रारंभिक प्रकरण जानेवारीमध्ये नोंदवले गेले होते, परंतु आता कोविड XBC, XAY आणि XAW चे नवीन प्रकार समोर आले आहेत.

Deltacron update : नेचर रिव्ह्यूज इम्युनोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, हा प्रकार डेल्टा व्हेरियंटइतकाच प्राणघातक आहे आणि त्यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याचा रेकॉर्ड-सेटिंग ट्रान्समिशन रेट मागील व्हेरिएंट ओमायक्रॉन सारखाच आहे.

Deltacron update : या नवीन प्रकाराबद्दल असे म्हटले जात आहे की सध्या सिंगापूरमध्ये हा सर्वात वेगाने पसरत आहे. आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी  दिलेल्या माहितीनुसार. ही निर्मिती तेव्हा होते जेव्हा दोन किंवा अधिक विषाणू एकाच वेळी पेशी संक्रमित करतात. डेल्टाक्रॉनचे कोणतेही सक्रिय प्रकरण भारतात अद्याप नोंदवले गेले नसले तरी, आतापासून सावध राहणे आवश्यक आहे.

Deltacron update : कोविडच्या या नवीन प्रकाराबाबत अद्याप फारशी माहिती आलेली नसल्यामुळे, सर्व गोष्टी केवळ अनुमानाच्या आधारे बोलल्या जात आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत आहेत की, गर्दीची ठिकाणे शक्यतो टाळावीत आणि जर  जायचे असेल तर काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा 

Back to top button