Facebook Head Resign : फेसबुकचे भारतातील प्रमुख अजित मोहन यांनी दिला राजीनामा | पुढारी

Facebook Head Resign : फेसबुकचे भारतातील प्रमुख अजित मोहन यांनी दिला राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे (META) भारतातील प्रमुख अजीत मोहन यांनी गुरूवारी राजीनामा दिला. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार ते आता Snap या सोशल मीडियासाठी काम करणार आहेत. मेटा या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे प्रमुख कोण असणार याविषयी देखील कंपनीने माहिती दिली आहे. (Facebook Head Resign)

मेटाचे ग्लोबल बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष निकोला मेंडेलसोहन यांनी अजित यांच्या राजीनाम्याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले की, अजित यांना दुसऱ्या कंपनीमध्ये मिळालेल्या संधीमुळे त्यांनी ही नोकरी सोडून दिली आहे. गेल्या चार वर्षांपासून ते कंपनीचे भारतातील सर्व काम सांभाळत होते. कंपनीसाठीचे त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. कंपनीची भारतातील व्यवसाय वृद्धी होण्यास त्यांचे मोठे सहकार्य राहिले आहे. त्यांच्या जागी आता मनीष चोपडा हे नवे प्रमुख असणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. (Facebook Head Resign)

आम्ही भारतासाठी अत्यंत वचनबद्ध आहोत. तसेच आमचं सर्व कार्य आणि भागीदारी पुढे नेण्यासाठी एक मजबूत नेतृत्व संघ आम्ही निर्माण केला आहे. अजित यांचे नेतृत्व आणि योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो, असेही मेंडेलसोहन यांनी मत व्यक्त केले.

हेही वाचा

Back to top button