सिंधुदुर्ग : कुडाळात बैलगाडी सजावट, सुदृढ बैल-रेडा स्पर्धा लक्षवेधी! | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळात बैलगाडी सजावट, सुदृढ बैल-रेडा स्पर्धा लक्षवेधी!

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ शहर राष्ट्रीय काँग्रेस आयोजित दीपोत्सव २०२२ निमित्त बुधवारी पार पडलेल्या बैलगाडी सजावट, सुदृढ बैल व रेडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर बाजारपेठेतून काढण्यात आलेली सजविलेल्या बैलगाडी, सुदृढ बैल व रेडा यांची मिरवणूक लक्षवेधी ठरली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी या स्पर्धेला भेट देऊन उत्साह वाढविला.

ढोलताशांच्या गजरात जिजामाता चौक येथून सायंकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. गांधीचौक, बाजारपेठ, पानबाजारमार्गे हाॅटेल गुलमोहर अशी मिरवणूक काढण्यात आली. परिक्षण रजनिकांत कदम व ठाकूर यांनी केले. १० बैलगाड्या, २५ ते ३० बैल व रेडे सजवून या मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. त्यामुळे ही स्पर्धा अधिक लक्षवेधी ठरली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी या स्पर्धेला हाॅटेल गुलमोहर जवळ भेट दिली. यावेळी आ.वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या हस्ते सहभागी स्पर्धांचा गौरव करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या स्पर्धेप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा चिटणीस प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, नगराध्यक्षा आफरीन करोल, न.पं.महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.अक्षता खटावकर, जिल्हा बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास शिरसाट, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, अल्संख्यांक सेलचे तरबेज शेख, तौसीफ शेख, बख्तावर मुजावर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सुंदरवल्ली स्वामी, सोनल सावंत, शुभांगी काळसेकर, रंजना जळवी, वैभव आजगांवकर, मयुर शारबिद्रे, अनंत खटावकर आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी आणि नागरीक उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button