T20WC : आयर्लंडने इंग्लंडाचा पराभव केल्याने भारत जिंकणार टी 20 वर्ल्ड कप! कारण…

T20WC : आयर्लंडने इंग्लंडाचा पराभव केल्याने भारत जिंकणार टी 20 वर्ल्ड कप! कारण…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये छोटे संघ आश्चर्यकारक कामगिरी करत आहेत. असाच एक संघ आयर्लंडने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला. खरेतर पावसाने इंग्लंडकडून विजयाची संधी हिसकावून घेतली असंच म्हणावे लागेल. कारण इंग्लिश संघाला विजयासाठी 33 चेंडूत 53 धावांची गरज होती. त्यांचे पाच फलंदाज जरी बाद झाले होते तरी अजून पाच विकेट हातात होत्या. पण ऐनवेळी पावसाने घात केला. वरुण राजाने कोसळायला सुरुवात केली आणि पंचांनी डकवर्थ-लुईस नियमानुसार आयर्लंडच्या बाजूने निर्णय देत त्या संघाला विजयी घोषित केले.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आयर्लंड संघाने प्रथम फलंदाजी केली आणि इंग्लंड समोर विजयसाठी 158 धावांचे टार्गेट दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 14.3 षटकांत केवळ 105 धावाच करू शकला. यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. अखेर डकवर्थ लुईस पद्धतीने आयर्लंडला विजेता घोषित करण्यात आले.

आयर्लंड-इंग्लंड यांच्यातील या सामन्याने लोकांना 2011 च्या वनडे वर्ल्ड कपची आठवण करून दिली. त्यावेळीही आयर्लंडच्या संघाने इंग्लंडचा तीन विकेट राखून पराभव केला होता. यासोबतच चाहत्यांनी आयर्लंडच्या या विजयानंतर टीम इंडिया यंदाचा टी-20 विश्वचषक जिंकेल असा दावा केला आहे. चाहत्यांनी वर्तवलेल्या या शक्यतेमागे नेमके काय कारण आहे त्या विषयी जाणून घेऊया….

भारताला टी 20 विश्वचषक जिंकण्याची संधी असल्याचा उल्लेख करत एका युजरने धोनीचा फोटो ट्विट केला आहे. हा युजर म्हणतो… '2011 साली आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर भारताने विश्वचषक जिंकला होता. 2022 मध्ये आयर्लंडने इंग्लंडला हरवले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा…'

आणखी एका युजरने या सामन्याच्या निकालासह भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतेवरही ट्विट केले आहे. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा फोटो टाकत त्याने म्ह्टलं की, 'गेल्या वेळी म्हणजे 2011 मध्ये आयर्लंडने विश्वचषकात इंग्लंडला हरवले तेव्हा असे घडले.'

एका युजरने तर मार्वल मालिकेतील हॉक-आयचा 'डोन्ट गिव्ह मी होप' हा फोटो पोस्ट केला आहे ज्यात तो म्हणतो की, '2011 मध्ये नेदरलँड भारताच्या गटात होते आणि 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. 2011 मध्ये आयर्लंडने इंग्लंडला पराभूत केले आणि भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news