दिल्लीतील मास्कची सक्ती रद्दबातल | पुढारी

दिल्लीतील मास्कची सक्ती रद्दबातल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची असलेली सक्ती केजरीवाल सरकारने रद्दबातल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घातलेला नसल्यास प्रशासनाकडून याआधी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात असे. गर्दीच्या ठिकाणी देखील मास्कपासून नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

मास्क सक्ती रद्द झाली असली तरी कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत दिल्ली मेट्रो महामंडळ लवकरच योग्य ते दिशानिर्देश जारी करणार आहे. गेल्या काही महिन्यांत दिल्लीतील कोरोनाचे संकट बऱ्यापैकी कमी झाले आहे. गेल्या चोवीस तासात राजधानीत कोरोनाचे १०७ नवे रुग्ण सापडले होते. संक्रमण दर देखील १.६४ टक्क्यांपर्यंत कमी झालेला आहे. दुसरीकडे चोवीस तासात ११९ रुग्ण बरे झाले आहेत.

सलग सातव्या दिवशी कोरोनाने दिल्लीत एकाही रुग्णाचा बळी घेतलेला नाही. सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या ४८८ इतकी असून यातील ४२ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी दोघेजण व्हेंटिलेटरवर आहेत तर १२ जण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. दिल्लीतील कंटेनमेंट विभागांची संख्या ४४ इतकी आहे.

हेही वाचा :

Back to top button