दीड महिन्यात ७ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

दीड महिन्यात ७ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढारी ऑनलाइन डेस्क : पिकांचे झालेले नुकसान तसेच इतर मदतीपोटी राज्य सरकारने गेल्या दीड महिन्यामध्ये सात हजार कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२०) पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत साडेचार हजार कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहेत. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या धर्तीवर सर्वच आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमधील नुकसानीची पाहणी करून, त्याचे तत्काळ पंचनामे करण्याचे ठरले असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याप्रमाणे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

दरम्यान, शेतकरी कर्जाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणले, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा पंचवीस हजार रुपये मिळण्याची योजना होती, नंतर ५० हजार रुपये जमा करण्याची योजना होती. ते काही कारणामुळे मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पुढाकार घेऊन आतपर्यंत ६ लाख ९० हजार शेकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा केली आहे. तसेच, येत्या काळामध्ये शेतीचे कोणतेही नुकसान झाल्यास थेट उपग्रहातून पाहणी होऊन, पंचनामे होऊन तत्कल मदत खात्यात जमा करण्याची योजना आम्ही आणत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर होतील आणि त्यांना मदतही तत्‍काळ मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हे वाचलतं का? 

Back to top button