भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश | पुढारी

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजप आमदार विजय देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्याच महिन्यात राज्यभर तसेच देशभरात पीएफआय या देशविघातक संघटनेच्या ठिकठिकाणीच्या कार्यालयावर तसेच कार्यकर्ते राहत असलेल्या घरावर छापे मारून अनेकांची धरपकड केली होती.

सोलापुरात सुद्धा पीएफआयच्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यांची धरपकड करून त्याला अटक केली. हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातील भाजपचे आमदार विजय देशमुख यांना पीएफआयच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याची माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली.

तसेच त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची भेट घेऊन आपल्या स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात मोहम्मद शफी बिराजदार (रा.सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) या इसमाने स्वतःच्या हस्तलिखिता मध्ये १ आक्टोंबर रोजी पोस्टाने हे पत्र आ.विजय देशमुख यांना पाठवलेले आहे. या पत्रामध्ये पीएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्याकडून गलिच्छ भाषा वापरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या पत्राची पोलीस आयुक्त यांनी गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button