Zaheer Khan Birthday : ‘नकल बॉल’चा अविष्कार करणाऱ्या जहीर खानला बनायचे होते इंजिनिअर, वडिलांमुळे बदलले करियर | पुढारी

Zaheer Khan Birthday : 'नकल बॉल'चा अविष्कार करणाऱ्या जहीर खानला बनायचे होते इंजिनिअर, वडिलांमुळे बदलले करियर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानचा आज (दि. ७) ४४ वा वाढदिवस आहे. आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण ६१० विकेट्स काढल्या. जहीर खानने नकल बॉलला टाकण्यास सुरुवात केली होती. २०११ च्या विश्वचषकामध्ये नकल बॉलचा वापर करून त्याने अनेक फलंदाजांना हैराण केले होते. जहीर खान नंतर अनेक भारतीय गोलंदाजांनी नकल बॉलचा वापर करत विकेट्स पटकावल्या आहेत. भारतीय संघाचा यशस्वी गोलंदाज जहीर खानला एकेकाळी क्रिकेटर बनण्याची इच्छा नव्हती. त्याला इंजिनअर बनायचे होते. (Zaheer Khan Birthday)

जहीर खान मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातला आहे. त्याला आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून इंजिनिअर बनायचे होते. मात्र, वडिलांनी त्याला वेगवान गोलंदाज बनून भारतासाठी खेळण्याचा सल्ला दिला. जहीर १७ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईला नेले. जिमखाना या संघाविरूद्ध त्याने घेललेल्या ७ विकेट्स मुळे तो चर्चेत आला होता. (Zaheer Khan Birthday)

‘या’ वर्षी केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

मुंबईत आल्यानंतर वेस्ट जोनच्या अंडर-१९ संघात जहीरचा समावेश करण्यात आला होता. यानंतर जहीरच्या क्रिकेटमधील कारकिर्दीला सुरवात झाली. एमआरएफ पेस अकादमीमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय संघाकडून तो भारतीय संघाकडून खेळेल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. २००० साली जहीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. (Zaheer Khan Birthday)

कशी होती जहीरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी (Zaheer Khan Birthday)

जहीरने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत भारताकडून ९२ कसोटी सामने तर २०० एकदिवसीय सामने खेळले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३११ विकेट्स पटकावल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २८२ बळी घेतले. दरम्यान त्याने भारतासाठी १७ टी-२० सामनेही खेळले. यामध्ये त्याने १७ विकेट्स पटकावल्या. जहीर खानने आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६१० विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. जहीरचा भारतीय संघातील यशस्वी गोलंदाजांमध्ये समावेश करण्यात येतो. (Zaheer Khan Birthday)

हेही वाचलंत का?

Back to top button