BB16: साजिद खानला शोमध्ये पाहून मंदाना करीमीचे बॉलिवूडला अलविदा | पुढारी

BB16: साजिद खानला शोमध्ये पाहून मंदाना करीमीचे बॉलिवूडला अलविदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करिमीने बॉलिवूडला टाटा बाय-बाय म्हटलं आहे. चित्रपट दिग्दर्शक साजिद खानवर MeToo माेहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. तो बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाल्यानंतर मंदानाने मीडियासमोर नाराजी व्यक्त केली आणि बॉलिवूडला अलविदा म्हटले आहे.

अभिनेत्री काय म्हणाली?

मंदानाने माध्यमांशी संवाद साधला. चित्रपटसृष्टीत महिलांचा आदर नसल्याचे तिचे म्हणणे आहे. MeToo चा आरोप असलेला चित्रपट निर्माता साजिद खान याचे छोट्या पडद्यावर एका मंचावर स्वागत करण्यात आले. वास्तविक, जेव्हापासून साजिद खानला अभिनेता सलमान खानने त्याचा रिॲलिटी शो बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून ओळख करून दिली, तेव्हापासून सोशल मीडियावर खूप गोंधळ सुरू असल्याचे ती म्हणाली.

MeToo मुळे कोणताही बदल झाला नाही

मंदाना म्हणाली, आजकाल लोक बदनाम होऊन पैसे कमावण्याचा विचार करतात. कोणाला पर्वा आहे? देशांमध्ये MeToo चळवळीने खरोखर काहीही बदललेले नाही.”

बॉलीवूडला अलविदा

जेव्हा अभिनेत्रीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा तिला विचारण्यात आले की, यामागील कारण काय? त्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘स्त्री असल्याने हे सोपे नाही. मला काम करताना कुठे आनंद मिळतो हे पाहण्याची गरज आहे. अनेकवेळा लोक ‘त्या’ गोष्टींमध्ये तडजोड करतात; पण मी तसे करू शकणार नाही. त्यामुळेच मला आता बॉलिवूडमध्ये काम करायचे नाही. मला अजिबात तडजोड करून काम करायला आवडत नाही.

मंदाना करीमी ‘लॉक अप’ मध्येही सहभागी

साजिदला ऑनस्क्रीन पाहून ती अस्वस्थ होते. पण तिला आश्चर्य वाटत नाही. मंदाना करीमी शेवटची रिॲलिटी शो लॉक अपमध्ये दिसली होती. ती म्हणते, ‘हे मला दुःखी करणारे आहे. गेल्या सात महिन्यांपासून मी काम न करण्याचे कारण हेच आहे. मी आता काम करू शकत नाही. मी कोणत्याही ऑडिशनला गेले नाही. मला बॉलिवूडमध्ये काम करायचे नाही. मला अशा उद्योगात सहभागी व्हायचे नाही जिथे महिलांचा आदर नाही.’

हेही वाचा : 

Back to top button