Alia Bhatt Baby Shower : आलियाचे डोहाळे जेवण पडलं पार | पुढारी

Alia Bhatt Baby Shower : आलियाचे डोहाळे जेवण पडलं पार

पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. गेल्या काही दिवसांत आलियाने बेबीबंप फोटोशूट करून चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. यानंतर सध्या आलियाचे डोहाळे जेवण म्हणजे, बेबी शॉवर (Alia Bhatt Baby Shower ) कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होती. यानंतर मुंबईतील ‘वास्तू’ या बंगल्यात आलियाचा डोहाळे जेवणाचा (Alia Bhatt Baby Shower ) कार्यक्रम पार पडला. यावेळी आलियाने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलाय. या कार्यक्रमाला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीसह नीतू कपूर , रिधीमा कपूर सहानी (नंणंद), शाहीन भट्ट आणि पूजा भट्ट (बहिणी), निला देवी (आजी), करिना कपूर, श्वेता बच्चन आणि करिश्मा कपूर यांनी हजेरी लावली. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील फोटोत आलियाच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसतोय.

रणबीर कपूर आणि आलिया गेल्या एप्रिल महिन्यात लग्न बंधनात अडकले. त्यानंतर जूनमध्ये आलियाने बेबीबंप फोटोशूट करून चाहत्यांना याबाबतची गुडन्यूज दिली होती. प्रेंग्नसीच्या काळात देखील आलिया ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशन सोहळा आणि सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. सिंगापूरहून मुंबईत परतल्यानंतर लगेचच आलियाचे बेबी शॉवर उरकलं.

हेही वाचलंत का? 

(photo, VIDEO ; viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button